नवी दिल्ली : देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी एक मोठी घोषणा केली आहे. जर कोणी आपली जुनी कार स्क्रॅप म्हणून दिली तर त्याला राज्य सरकारकडून नवीन कारवर सवलत दिली जाईल. केंद्र सरकारने राज्य सरकारांना आपापल्या राज्यांमध्ये जुन्या वाहनांचे स्क्रॅपिंग अनिवार्य करण्यास सांगितले आहे. त्यानंतर बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि केरळसह 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मोटर वाहन किंवा रोड टॅक्समध्ये सूट जाहीर केली आहे.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे जुन्या वाहनांना स्क्रॅप करण्याऐवजी नवीन कार खरेदीवर 25 टक्के सवलत आणि व्यावसायिक वाहनांवर 15 टक्क्यांपर्यंत सूट देणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 21 पैकी 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी जुन्यो वाहनांना स्क्रॅप केल्यानंतर नोंदणी दरम्यान व्यावसायिक किंवा वाहतूक वाहनांना 15 टक्के रोड टॅक्स सवलत दिली जाईल असे म्हटले आहे.खासगी वाहनांच्या बाबतीत, 12 राज्ये रोड टॅक्समध्ये 25 टक्के सूट देत आहेत. हरियाणा स्क्रैप मूल्याच्या 10 टक्के किंवा 50 टक्क्यांपेक्षा कमी सवलत देत आहे. दुसरीकडे, उत्तराखंड 25 टक्के किंवा 50,000 रुपये यापैकी जी कमी असेल ती सूट देत आहे. कर्नाटक नवीन वाहनाच्या किमतीनुसार रोड टॅक्समध्ये सूट देत आहे. उदाहरणार्थ, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या कारवर 50,000 रुपयांची सूट मिळेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.