व्यक्तीचा 50 रुपयांसाठी वाद; दुकानदाराला अशा ठिकाणी चावला की...
लखनऊ : आपण अनेकदा कपडे खरेदी करण्यासाठी कापड दुकानांमध्ये जातो. दुकानदाराने आपल्याला काहीतरी डिस्काऊंट द्यावा, असं प्रत्येकाला वाटतं. कधीकधी दुकानदारही डिस्काऊंट देतात, तर कधीकधी डिस्काऊंट न मिळाल्याववे ग्राहक त्यांच्याशी वाद घालू लागतात. मात्र, आता उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून अजब प्रकरण समोर आलं आहे. यात अवघ्या 50 रुपयांवरुन झालेल्या भांडणात एका व्यक्तीने दुकानदाराचं बोट चावल्याची विचित्र घटना घडली आहे.
दुकानदाराने हव्या त्या किमतीत फ्रॉक विकण्यास नकार दिल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. 'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, कपड्यांचे दुकान चालवणारे दुकानदार शिवचंद्र कारवारिया यांनी एका ग्राहकाला फ्रॉक विकला. दुसऱ्या दिवशी ग्राहक पुन्हा दुकानदाराकडे आला आणि त्याने फ्रॉक खूपच लहान असल्याचे सांगून मोठा आकार मागितला. मात्र, मोठ्या साईजच्या फ्रॉकसाठी आणखी 50 रुपये द्यावे लागतील, असं दुकानदाराने म्हटल्याने वाद सुरू झाला.
ग्राहकाने जास्तीचे पैसे देण्यास नकार दिला आणि दुकानदाराशी वाद घालण्यास सुरुवात केल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे. नंतर याचं रुपांतर जोरदार वादात झालं आणि त्या व्यक्तीने दुकानदाराच्या डाव्या हाताचं बोटच चावलं. भांडणानंतर आरोपीनी दुकानदाराचे कपडे रस्त्यावर फेकले आणि पळून जाण्यापूर्वी त्याला धमकावलं. जखमी दुकानदाराने नंतर जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
कोतवाली नारायणी स्टेशन प्रभारी (एसएचओ) सुरेश सैनी यांनी सांगितलं की, दुकानदाराच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत असून त्याला पकडल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे एसएचओने सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.