लवकरच आता उन्हाळी सुट्ट्या सुरु होतील. तुम्ही सुद्धा एक सुन्दर ट्रिपचा अनुभव घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची ठरेल, एखादी ट्रिप बुक करायची म्हंटली तर ट्रेन किंवा फ्लाइट बुकिंग, हॉटेल बुकिंग अशा अनेक गोष्टी आगाऊ कराव्या लागतात.
अशा लोकांसाठी भारतीय रेल्वेने एक खास पॅकेज आणले आहे, ज्यामध्ये ट्रेनमध्येच (IRCTC) पंचतारांकित हॉटेल्ससारख्या सुविधा आहेत.म्हणजे प्रवास करीत असताना तुम्हाला एका रॉयल हॉटेल मध्ये थांबल्याचे फील येईल.
आम्ही ज्या ट्रेनबद्दल बोलत आहोत ती श्री रामायण यात्रा ट्रेन आहे. IRCTC उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ही एसी डिलक्स ट्रेन चालवणार आहे. यामध्ये एसी फर्स्ट कूप, एसी फर्स्ट, एसी सेकंड आणि एसी थर्ड अशा तीन श्रेणीतील कोच असतील. ज्याद्वारे प्रत्येक वर्गातील लोक प्रवास करू शकतात. ही ट्रेन 7 जून रोजी धावणार आहे. संपूर्ण प्रवास 17 रात्र आणि 18 दिवसांचा असेल. या ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी देशातील 14 शहरांना भेट देऊ शकतील आणि 39 धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतील. ही ट्रेन दिल्लीतील सफदरजंग (IRCTC) स्टेशनवरून धावणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, श्री रामायण यात्रा ट्रेन अयोध्या, नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट, नाशिक, हम्पी, रामेश्वरम, भद्राचल आणि नागपूरमार्गे दिल्लीला परतेल. यामध्ये प्रवाश्यांना प्रभू रामाशी संबंधित ठिकाणांना (IRCTC) भेट देता येणार आहे.
चारही श्रेणींचे भाडे वेगवेगळे आहे. हे सिंगल, डबल आणि ट्रिपल शेअरिंगसाठी बुक केले जाऊ शकतात. फर्स्ट (IRCTC) एसी कूप 166810 रुपये, फर्स्ट एसी 145745 रुपये, सेकंड एसी 134710 रुपये, थर्ड एसी 94600 रुपये आहे. हे भाडे 33 टक्के डिस्काउंटनंतर आहे.
नंदीग्राम- भारत-हनुमान मंदिर आणि भारत कुंड.
जनकपूर- राम जानकी मंदिर, धनुष धाम मंदिर आणि परशुराम कुंड.सीतामढी- जानकी मंदिर आणि पुनौरा धाम.बक्सर- राम रेखा घाट, रामेश्वर नाथ मंदिर.वाराणसी- तुलसी मानस मंदिर, संकट मोचन मंदिर, विश्वनाथ मंदिर आणि गंगा आरती.सीता संहित स्थळ, सीतामढी- सीता माता मंदिर.प्रयागराज- भारद्वाज आश्रम, गंगा-यमुना संगम, हनुमान मंदिर.शृंगावेरपूर- शृंगी ऋषी समाधी आणि शांता देवी मंदिर, रामचौरा.चित्रकूट- गुप्त गोदावरी, रामाघत, सती अनुसुईया मंदिर.नाशिक- त्र्यंबकेश्वर मंदिर, पंचवटी, सीतागुफा, काळाराम मंदिर.हंपी: अंजनाद्री टेकडी, विरुपाक्ष मंदिर आणि विठ्ठल मंदिर.रामेश्वरम- रामनाथस्वामी मंदिर आणि धनुषकोडी.भद्राचलम- श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिर, अंजनेय मंदिर.-नागपूर- रामटेक किल्ला आणि मंदिर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.