सांगलीत भाजपाला मोठा धक्का :, 4 नगरसेवकांचा राजीनामा देऊन विशाल पाटील यांना दिला पाठिंबा
सांगली : भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपचा राजीनामा देऊन विशाल पाटील यांना पाठींबा दिल्याची घटना ताजी असताना आता, भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. मिरज शहरातील चार नगरसेवकांनी पक्ष आणि पदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार असणारे वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे.
बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात
महाविकास आघाडीतील संघर्षामुळे सांगली लोकसभा मतदारसंघाची राज्यभर मोठी चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेल्यानंतर अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.भाजप उमेदवार संजय पाटील यांना फायदा होण्याची शक्यता महाविकास आघाडीची ताकद विभागली गेल्याने याचा भाजप उमेदवार संजय पाटील यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, आता विशाल पाटील यांनी भाजपला धक्का दिला असून, मिरजमधील भाजप नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत विशाल पाटलांचा प्रचार सुरू केला आहे.
बंडखोर चार नगरसेवकांच्यावर कारवाई
मिरजमधील भाजपच्या काही नगरसेवकांनी यापूर्वीच संजयकाका पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करीत विशाल पाटलांना साथ देण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षांकडून बंडखोर चार नगरसेवकांच्यावर कारवाईचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. परंतु, पक्षाकडून अशी कारवाई होण्याच्या आधीच भाजपचे बंडखोर नगरसेवक संदीप आवटे, निरंजन आवटी, आनंदा देव माने आणि शिवाजी दुर्वे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
विशाल पाटलांची ताकद वाढण्यास मदत
त्यामुळे विशाल पाटलांची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यान, आणखी तीन नगरसेवकही गुप्तपणे विशाल पाटील यांनाच मदत करणार असल्याचा दावाही या बंडखोर नगरसेवकांकडून करण्यात आला आहे.
कारवाई पूर्वीच राजीनामा
विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या सभेला थेट मंचावरच भाजपचे मिरजेचे काही नगरसेवक आले होते. त्यानंतर खासदार संजयकाका पाटील यांनी हे केवळ पैसे मिळवण्यासाठी उद्योग करीत असल्याचा आरोप केला, तर जिल्हाध्यक्ष यांच्याकडून कारवाईचा प्रस्ताव देखील पाठवला होता, मात्र तत्पूर्वीच या चार नगरसेवकांनी राजीनामा देऊन विशाल पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.