Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शादी डॉटकॉमवरील स्थळ पाहणं पडले महागात :, लग्नाच्या अमिषाने अभियंता तरुणीची फसवणूक :, 40 लाखाला घातला गंडा

शादी डॉटकॉमवरील स्थळ पाहणं पडले महागात :, लग्नाच्या अमिषाने अभियंता तरुणीची फसवणूक :, 40 लाखाला घातला गंडा 


शादी डॉटकॉम वर स्थळ पाहताय! सावधान, शादी डॉटकॉमवर नोंदणी केल्यानंतर एका भामट्याने पुण्यातील आयटी अभियंत्या तरुणीला लग्नाच्या आमिष दाखवत ४० लाख ५० हजारांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार राजेश शर्मा, बँक खातेधारक व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. 



खराडी भागात आयटी कंपनीत कामाला असलेली तरुणीची फसवणूक

पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणी खराडी भागातील नामांकित आयटी कंपनीत नोकरी करते. ती मुंढवा येथील केशवनगर येथे राहते. विवाहसाठी तरुणीने शादी डॉटकॉम संकेतस्थळावर नोंदणी केली होती. तेथे राजेश शर्मा नावाच्या व्यक्तीसोबत ओळ‌ख झाली. ओळखीनंतर ते बोलत असत. शर्माने तरुणीला तो विदेशात असल्याचे सांगितले. पुढे संपर्क वाढल्यानंतर शर्मा आणि तरुणी व्हिडीओकॉलद्वारे बोलत होते. एकेदिवशी शर्माने भारतात येऊन तरुणीसोबत लग्न करायचे आहे. तसेच, घर खरेदी करून व्यवसाय करायचा आहे असे सांगितले.

प्रवासाची विमान तिकिटे खरेदी केल्याचे दाखविले

तरुणीला विश्वास वाटावा म्हणून त्याने प्रवासाची विमान तिकिटे खरेदी केल्याचे दाखविले. त्यानंतर त्याने तो दिल्ली विमानतळावर पोहचला असून, मॉनिटरींग फंड, सेंट्रल ब्युरो ऑफ इनव्हेस्टीगेशन, करन्सी कनव्हर्जनसाठी पैसे पाहिजे आहेत असे सांगत तरुणीकडून वेळोवेळी बँक खात्यावर तब्बल ४० लाख ६० हजार रुपये पाठवले. मात्र, काही दिवसांतच तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार तिने मुंढवा पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.