Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नागरिकांनो सावधान! 3 दिवस उष्णतेची लाट, काळजी घ्या

नागरिकांनो सावधान! 3 दिवस उष्णतेची लाट, काळजी घ्या

मुंबई आणि ठाण्यासह कोकणात आजपासून (२७ एप्रिल) उष्णतेच्या लाटेचा  अंदाज पुन्हा वर्तवण्यात आला आहे. मुंबई , ठाणे , रायगड  आणि पालघरमधील काही भागांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून पुढच्या तीन दिवसांत मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांनाही कडक उन्हाच्या झळांना  सामोरं जावं लागण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

उत्तर कोकणात २८ आणि २९ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा  इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशावर जाण्याचा अंदाज आहे. याआधी १५ आणि १६ एप्रिल या दोन दिवसांत मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये अनेक ठिकाणी तापमानामध्ये वाढ जाणवली. त्यावेळी नवी मुंबईत पारा ४१ अंश, पनवेलमध्ये ४३ अंश सेल्सियसवर गेला होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान होत असून नांदेड, परभणी, जालना, अमरावती, वर्धा जिल्ह्यांत वादळी पावसाने तडाखा दिला. राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण असल्याने कमाल तापमानाचा पारा सरासरीपर्यंत कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदण्यात आले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.