Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'हेपिटायटिस' या संसर्गजन्य आजारामुळे दररोज 3500 लोकांचा मृत्यू : जाणून घ्या त्याची लक्षणें आणि उपाय

'हेपिटायटिस' या संसर्गजन्य आजारामुळे दररोज 3500 लोकांचा मृत्यू : जाणून घ्या त्याची लक्षणें आणि उपाय 
संसर्गामुळे होणाऱ्या अनेक आजारांमध्ये हिपॅटायटीस या आजाराचा समावेश होतो. या आजारातूनच काविळीसारखा गंभीर आजार होऊ शकतो. 2022 मध्ये भारतात हेपिटायटिसची 3.5 कोटींपेक्षा जास्त प्रकरणे होती, जी त्यावर्षी जागतिक स्तरावरील एकूण प्रकरणांपैकी 11.6 % होती.


त्यामुळे चीन खालोखाल भारताचा या यादीत दुसरा क्रमांक लागतो. जागतिक स्तरावर हिपॅटायटीस विषाणूच्या संसर्गाने होणार्‍या मृत्यूंची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. या आठवड्यात पोर्तुगालमध्ये जागतिक हिपॅटायटीस शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या शिखर परिषदेमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने हिपॅटायटीसवर आधारित एक अहवाल प्रसिद्ध केला. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२४ च्या जागतिक हिपॅटायटीस अहवालात हि आकडेवारी देण्यात आली आहे. त्याची लक्षणे आणि उपाय काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

हिपॅटायटीस लक्षणे

त्वचा किंवा डोळे पिवळे येणे
भूक न लागणे
मळमळ आणि पोटदुखी
ताप
गडद लघवी आणि फिकट रंगाची विष्ठा
सांधेदुखी आणि थकवा
हिपॅटायटीस संसर्ग होण्याची करणे :

इंजेक्शनद्वारे
रक्त संक्रमणातून
आईपासून नवजात बाळाला
प्रसूतिदरम्यान
असुरक्षित लैंगिक संबंधाद्वारे

हेपिटायटिस बी आणि सीध्ये फरक काय?

सीडीसीच्या मते, हेपिटायटिस बी व सीचे संक्रमण दोन वेगवेगळ्या विषाणूंमुळे होते. जरी प्रत्येकामध्ये समान लक्षणे दिसत असली तरी दोन्ही संक्रमणे वेगवेगळ्या प्रकारे पसरतात आणि यकृतावर वेगळ्या प्रकारे परिणाम करू शकतात. दोन विषाणूंमधला महत्त्वाचा फरक म्हणजे संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील द्रवपदार्थांच्या संपर्कात आल्याने अर्थात वीर्य किंवा योनिमार्गातील द्रव व रक्त यांसारख्या द्रवपदार्थांच्या संपर्कात आल्याने लोकांना हेपिटायटिस बी होऊ शकतो,

मृत्यूची संख्या २ लाखांनी वाढली :

हिपॅटायटीसमुळे झालेल्या मृत्यूची अंदाजे संख्या 2019 मध्ये 11 लाखांवरून 2022 मध्ये 12 लाख झाली आहे. जगभरात हिपॅटायटीस बी आणि सी संसर्गामुळे दररोज 3500 लोकांचा मृत्यू होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

निदान होत नाही हेच मोठे कारण :

हिपॅटायटीस संसर्ग रोखण्यात जागतिक स्तरावर प्रगती होऊनही मृत्यूदर मात्र वाढतच आहे. कारण हिपॅटायटीस असलेल्या फारच कमी लोकांचे निदान आणि उपचार वेळेवर केले जातात. असे जागतिक आरोग्य संघटनेने निरीक्षण नोंदवले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.