अपुऱ्या पावसाचा आणि पाण्याच्या कमतरतेचा फटका हळद उत्पादनाला बसला आहे. देशात हळदीचे अंदाजे ५५ ते ६० लाख पोत्यांचे (एक पोते ५० किलोचे) उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २५ ते ३० लाख पोत्यांनी उत्पादनात घट झाली आहे. यावर्षीचा हळद विक्रीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, देशातून सुमारे ७० टक्के हळदीची विक्री झाली आहे, असे हळद उद्योगातील जाणकारांनी सांगितले.
देशात हळदीचे सुमारे ८० लाख पोत्यांचे उत्पादन होते. गत हंगामात अपुरा पाऊस झाल्याने हळदीची ३ लाख २५ हजार ६११ हेक्टरवर लागवड झाली. गेल्या चार वर्षांपासून हळदीला अपेक्षित दर मिळाले नाहीत. त्यात कमी पाऊस,पाण्याची टंचाई यामुळे शेतकऱ्यांनी हळद लागवड केली नाही. हळद वाढीच्या काळात पाण्याची कमतरता भासल्याने त्याचा फटका पीक वाढीला बसला. त्यामुळे हळदीच्या उत्पादनावर परिणाम झाला.
हळदीला पुन्हा सोन्याचे दिवस येतील?
यंदा हंगामाच्या प्रारंभापासून हळदीचे दर चांगले आहेत. हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी नाही. देशभरातील हळदीच्या बाजारपेठेतून उठाव होत आहे. सांगली व निजामाबाद बाजारात अनुक्रमे ८५ टक्के हळदीची विक्री झाली आहे. एरोड बाजारात वर्षभर हळदीची आवक असते. सध्या बाजारात हळदीची आवक कमी अधिक प्रमाणात होत आहे. मराठवाड्यात अंदाजे २५ लाख पोत्यांचे उत्पादन झाले असून, १५ लाख पोत्यांची विक्री झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.गतवर्षी मे महिन्यात हळदीच्या दर्जानुसार साडेसात ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर होता. सध्या हळदीला प्रतवारीनुसार १५ हजार रुपयांपासून २२ हजार रुपयांपर्यंत दर आहे. अर्थात, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा हळदीच्या दरात सरासरी दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येत्या काळातही हळदीचे दर टिकून राहतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
सांगलीत वाढली हळद बियाण्यांची मागणी लागवड लांबणीवर जाण्याची शक्यता महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा यांसह अन्य राज्यांत हळद लागवड केली जाते. या वर्षीची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वमशागती केल्या आहेत. शेतकरी बियाणेदेखील तयार करू लागला आहे. परंतु गतवर्षी अपुरा पाऊस झाला. पाण्याची टंचाई, वाढते तापमान यामुळे हळद लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
प्रतवारीनुसार हळदीचे दर (प्रतिक्विंटल)
लगडी २१ हजार ते २२ हजारपावडर क्वालिटी १७ हजार ते १७ हजार ५००मध्यम १७ हजार ते १७ हजार ५००उच्च प्रतीची १९ हजार ते २१ हजारगड्डा १६ हजार ५०० ते १७ हजार २००गोपाळ मर्दा, हळद व्यापारी, सांगलीयंदा हळदीचे दर टिकून आहेत. वास्तविक, हळद विक्री झाल्यापासून आतापर्यंत प्रतिक्विंटलला १ हजार रुपयांची तेजी-मंदी झाली आहे. परंतु त्याचा दरावर फारसा परिणाम झाला नाही.मनोहर सारडा, हळद व्यापारी, सांगलीया वर्षी हळदीची निर्यातही चांगली सुरू आहे. इराण, इराकमधून हळदीला चांगली मागणी आहे. तसेच यंदा पाण्याची कमतरता असल्याने लागवडीवर परिणाम होऊ शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.