Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! मंजूर झालेल्या कर्जाचे 2 कोटी रुपये परस्पर सावकाराच्या खात्यात जमा

धक्कादायक! मंजूर झालेल्या कर्जाचे 2 कोटी रुपये परस्पर सावकाराच्या खात्यात जमा 


सावकारांचे कर्ज फेडण्यासाठी पतसंस्थेत कर्ज प्रकरणे दाखल केलेल्या 12 कर्जदारांची मंजूर झालेली सुमारे 2 कोटी रुपयांची रक्कम परस्पर सावकारांच्या खात्यात वर्ग करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेर तालुक्यात उघडकीस आला आहे.

या प्रकरणी राजे शिवाजी बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आझाद ठुबे, मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी भालेकर यांच्यासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे पारनेरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पतसंस्थेचे चेअरमन आझाद ठुबे, मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी भालेकर, पोपट बोल्हाजी ढवळे व शिरूर येथील रणजित गणेश पाचारणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पारनेर तालुक्यातील राजे शिवाजी बिगरशेती सहकारी पतसंस्था कान्हूरपठार या संस्थेच्या पारनेर शाखेत हा प्रकार घडला आहे. मे 2023 ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या प्रकाराची तक्रार कर्जदारांनी पारनेरच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात केल्यावर त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत तथ्य आढळून आल्यावर सहकार अधिकारी तात्यासाहेब शहाजी भोसले यांनी बुधवारी (दि. 3) पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

तक्रारदार शिवाजी चंदर रिकामे याच्यासह अन्य 11 जणांनी शिरूर येथील एका सावकाराकडून 4 टक्के व्याजदराने सुमारे 2 कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले होते. ते फेडण्यासाठी त्या सर्वांनी राजे शिवाजी बिगरशेती सहकारी पतसंस्था कान्हूरपठार या संस्थेच्या पारनेर शाखेत कर्ज प्रस्ताव सादर केले.

 त्यासाठीच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यावर सर्वांचे कर्ज प्रस्ताव मंजूर झाले. मात्र, त्याची रक्कम कर्जदारांना न देता पतसंस्थेचे चेअरमन आझाद ठुबे व मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी भालेकर यांनी कर्जाची 2 कोटी रुपयांची रक्कम हंगा (ता. पारनेर) येथील सागर असोसिएटचे पोपट बोल्हाजी ढवळे यांच्या खात्यावर वर्ग करत या कर्जदारांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.