Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक ! मुंबईतील अँटॉप हिल परिसरात कारमध्ये 2 बेपत्ता मुलांचे मृतदेह

धक्कादायक ! मुंबईतील अँटॉप हिल परिसरात कारमध्ये 2 बेपत्ता मुलांचे मृतदेह

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कालपासून मुंबईतील 2 मुले बेपत्ता होती. या मुलांचे मृतदेह आज एका कारमध्ये आढळले आहेत. मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. हे दोघे भाऊ-बहीण असल्याची माहिती मिळाली आहे. साजिद आणि मुस्कान अशी या दोघांची नावे आहेत. काल दुरापी दिडच्या आसपास ही भावंडे घराबाहेर पडली होती. खूप वेळ हे दोघे परत न आल्याने पालकांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. दोन्ही मुले कुठेही न सापडल्याने अखेर त्यांनी अँटॉप हिल पोलीस स्थानकामध्ये मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यापैकी एकाचे वय 5 वर्षे तर एकाचे वय 7 वर्षे आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच सर्च ऑपरेशन सुरु केले. पण त्यात काहीही हाती लागले नाही. पण या मुलांच्या घराजवळच्या एका धूळ खात पडलेल्या गाडीमध्ये दोन मुलांचे मृतदेह आढळले, या मुलांच्या मृतदेहाच्या पोस्टमार्टम रिपोर्टची पोलीस वाट बघत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.