पुणे : पतीने पत्नीच्या मदतीनेच एका १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. ओळखीच्याच असलेल्या महिलेनं तरुणीला वडापाव खायला देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं. त्यानंतर तरुणीला घरात सोडून महिला बाहेर गेली. त्यावेळी तिने घराला बाहेरून कडी लावली. त्यानंतर महिलेच्या पतीने तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ३ मार्च रोजी दुपारी दोन ते रात्री साडे अकराच्या सुमारास कात्रज परिसरात हा प्रकार घडला. पीडित तरुणीने शुक्रवारी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय. यावरून प्रल्हाद सखाराम साळुंके आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी भाजी मंडईतून चालत जात होती. तेव्हा तिच्या ओळखीची असलेली महिला तिला भेटली. महिलेने तरुणीला तिच्या घरी नेले. तरुणीला वडापाव द्यायचा बहाणा करून एकटीलाच घरी ठेवलं आणि बाहेर गेली. महिलेने जाताना बाहेरून घराला कडी लावली.महिला निघून जाताच तिच्या पतीने तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जबरदस्तीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. या अत्याचारानंतर पीडित तरुणीने थेट पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पती पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.