Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! पुण्यात 18 वर्षाच्या मुलीने केला आईचा खून, मित्रांसोबत मिळून रचला कट

धक्कादायक! पुण्यात 18 वर्षाच्या मुलीने केला आईचा खून, मित्रांसोबत मिळून रचला कट 


पुण्यात मित्रांनीच मैत्रिणीचे अपहरण करून खून केल्याची घटना ताजी असतानाच आता एका १८ वर्षांच्या मुलीने मित्रासोबत मिळून आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय. वडगाव शेरीत राहणाऱ्या मुलीने मित्रासोबत मिळून आईच्या डोक्यात हातोडा मारून खून केला.

हातोड्याने वार केल्यानंतर उशीने तोंड दाबले. यामुळे आईचा मृत्यू झाला. यानंतर मुलीने आईचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचला. पण नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानं पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अधिक तपास केला असता हा खून असल्याची माहिती समोर आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगल संजय गोखले या त्यांच्या मुलीसोबत वडगाव शेरी इथं राहत होत्या. त्यांची मुलगी योशिता संजय गोखले हिने तिचा मित्र यश मिलिंद शितोळे याच्योसबत मिळून आई मंगल यांचा खून केला. या प्रकरणी विनोद शाहू गाडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी खाक्या दाखवताच योशिता हिने मित्राच्या मदतीने आपण आईचा खून केल्याचं पोलिसांना सांगितलं. आई घरात झोपली असताना योशिताने आईचे तोंड उशीने दाबले. त्याचवेळी तिचा मित्र यशने डोक्यात हातोड्याने वार केला. आपला गुन्हा लपवण्यासाठी आई बाथरूममध्ये पाय घसरून पडली आणि गंभीर जखमी झाल्याचं योशिताने नातेवाईकांना सांगितलं. मात्र मुलीच्या बोलण्यावरून नातेवाईकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

योशिताची पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पण पोलिसी खाक्या दाखवताच तिने खूनाचे कारण सांगितले. योशिताने मित्राच्या मदतीने आईच्या खात्यातून न सांगता काही पैसे काढले होते. आईला हा प्रकार समजल्यास ती रागवेल या भीतीने योशिताने मित्रासोबत मिळून आईचा खून केला. मित्रासोबत खूनाचा कट रचून १८ वर्षांच्या मुलीने आईची हत्या केल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.