Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

15 एप्रिलपासून कॉल फॉरवर्डिंग होणार बंद?

15 एप्रिलपासून कॉल फॉरवर्डिंग होणार बंद?


नवी दिल्ली: भारतात गेल्या काही महिन्यांपासून 'कॉल फॉरवर्डिंग स्कॅम'ची प्रकरणं वाढली आहेत. याला आळा घालण्यासाठी आता टेलिकॉम मंत्रालय मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 15 एप्रिल 2024 पासून देशभरात USSD आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात येणार आहेत.

"सध्या उपलब्ध USSD-based कॉल फॉरवर्डिंग सेवा पुढील सूचनेपर्यंत रद्द करण्यात येणार आहेत. याबाबत टेलिकॉम ऑपरेटर्सना आदेश देण्यात आले आहेत", असं टेलिकॉम मंत्रालयाने स्पष्ट केलं. ही सेवा कायमची बंद केली नसून, तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करणार असल्याचंही मंत्रालयाने स्पष्ट केलं.


कॉल फॉरवर्डिंग सेवा सुरू केल्यानंतर तुम्ही एखाद्या मोबाईल नंबरवर येणारे कॉल आणि मेसेज दुसऱ्या नंबरवर पुढे ढकलू शकता. आपल्या एका नंबरला नेटवर्क नसल्यास महत्त्वाचे कॉल्स मिस होऊ नयेत यासाठी ही सेवा भरपूर फायद्याची ठरते. मात्र, याचा फायदा घेत कित्येक जणांची फसवणूक देखील केली जात आहे.

फसवणूक टाळण्यासाठी म्हणून केंद्राने सर्वच कॉल फॉरवर्डिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तुम्ही स्वतः ही सेवा सुरू केली असेल, तर तीदेखील पॉझ होणार आहे. यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा कॉल फॉरवर्डिंग री- इनेबल करावं लागेल. यासाठी USSD व्यतिरिक्त इतर पर्याय निवडावे असा सल्ला मंत्रालयाने ग्राहकांना दिला आहे. ही सेवा कायमची बंद केली नसल्यामुळे, भविष्यात अधिक सुरक्षा लेअर्स आणि प्रतिबंधात्मक उपायांसोबत पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.