Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

14 फूट लांबीची कोठडी,1 टीव्ही आणि 3 पुस्तके!

14 फूट लांबीची कोठडी,1 टीव्ही आणि 3 पुस्तके!


तिहार तुरुंगाचे नाव काढले की तेथील उंचच उंच भिंती, तारा आणि एका बाजूला पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तातील जागेचे चित्र मनात उमटते. या तुरुंगात देशभरातील गुन्हेगार राहतात. आता याच तुरुंगात अरविंद केजरीवालही बंद आहेत. केजरीवाल यांना मद्यघोटाळ्या प्रकरणी १५ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले आहे.


सोमवार, १ एप्रिल रोजी संध्याकाळी सव्वा चार वाजता केजरीवाल यांनी तुरुंगात पाऊल टाकले.तिहार तुरुंगातील कोठडी क्रमांक दोनमध्ये केजरीवाल यांना ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या कोठडीत आम आदमी पक्षाचे संजय सिंह बंद होते. नंतर त्यांना तुरुंग क्रमांक सहामध्ये टाकण्यात आले. तर, मनीष सिसोदिया तुरुंग क्रमांक एकमध्ये आहेत. तर, याच प्रकरणातील चौथ्या आरोपी कविता यांना महिलांचा तुरुंग क्रमांक सहा येथे ठेवण्यात आले आहे. तर, अन्य एक आरोपी विजय नायर तुरुंग क्रमांक चारमध्ये बंद आहेत. तर, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन तिहार तुरुंगातील सात क्रमांकाच्या तुरुंगात बंद आहेत.

सर्व आरोपींचे तुरुंग आजूबाजूलाच आहेत. मात्र कोणीच एक-दुसऱ्याची भेट घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांची तुरुंगात आत बैठक होऊ शकेल, याची शक्यता कमी आहे. केजरीवाल यांनी तुरुंगात अभ्यासासाठी तीन पुस्तकांची मागणी केली आहे. केजरीवाल यांनी रामायण, गीता आणि नीरजा चौधरी यांचे 'हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाइड' या पुस्तकाची मागणी केली आहे. तसेच, तुरुंगात औषधे ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच, तुरुंगात भेट देऊ शकतील, अशा सहा जणांची नावे दिली आहेत. तुरुंग नियमानुसार, तुरुंगातील कैद्याला त्याला ज्याला भेटायची इच्छा आहे, अशा १० व्यक्तींची नावे तो देऊ शकतो. या नियमानुसार, त्यांनी पत्नी सुनीता, मुलगा पुलकीत, मुलगी हर्षिता, मित्र संदीप पाठक, पीए विभव कुमार आणि आणखी एका मित्राचे नाव दिले आहे.

आठवड्यातून दोन व्हिडीओ कॉल करण्यास मुभा

केजरीवाल यांनी सोमवारी तुरुंगात घरून पाठवण्यात आलेला जेवणाचा डबा खाल्ला. ते आठवड्यातून दोनदा व्हिडीओ कॉल करू शकतील. ते रोज पाच मिनिटे फोनवर बोलूही शकतात. ज्यांची नावे त्यांनी नोंदवली आहेत, त्यांच्याशी ते रोज पाच मिनिटे बोलू शकतात.

तुरुंगात असतील या सुविधा

ज्या कोठडीत केजरीवाल यांना ठेवण्यात आले आहे, ही कोठडी सुमारे १४ फूट लांब आणि आठ फूट रुंद आहे. यात शौचालयही आहे. तसेच, टीव्हीदेखील आहे. सिमेंटचा कट्टाही असून त्यावर अंथरण्यासाठी चादरही दिली आहे. तसेच, पांघरूण आणि एक उशीही देण्यात आली आहे. त्यात दोन बादल्याही असतील.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.