Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

10 ॲनाकोंडाची विमनातून तस्करी :, बेंगळुरूमध्ये एकाला अटक

10 ॲनाकोंडाची विमनातून तस्करी :, बेंगळुरूमध्ये एकाला अटक 


कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दहा ॲनाकोंडा जप्त केले आहेत. ॲनाकोंडाची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाला अटक करण्यात आली.


बँकॉकहून आलेल्या या प्रवाशाने बॅगमध्ये १० पिवळा ॲनाकोंडा लपवून ठेवले होते. पिवळा ॲनाकोंडा ही नदीतील सापाची एक प्रजाती आहे. पिवळे ॲनाकोंडा सामान्यतः पॅराग्वे, बोलिव्हिया, ब्राझील, ईशान्य अर्जेंटिना आणि उत्तर उरुग्वे येथे आढळतात. कायद्यानुसार वन्यजीव व्यापार आणि तस्करी भारतात बेकायदेशीर आहे. अधिकाऱ्यांनी या प्रवाशाला अडवले आणि बॅगची तपासणी केली असता ही घटना उघडकीस आली. प्रवाशाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. बेंगळुरू कस्टम विभागाने याबाबत माहिती दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.