Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नरेंद्र मोदीच्यां रोड शोदरम्यान स्टेज कोसळून 10 पेक्षा अधिक जखमी

नरेंद्र मोदीच्यां रोड शोदरम्यान स्टेज कोसळून 10 पेक्षा अधिक जखमी 


मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोदरम्यान अपघात घडला आहे. रस्त्याच्या कडेला स्वागतासाठी उभं केलेलं स्टेज कोसळल्याने दहापेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचं सांगितलं जातंय. जखमींमध्ये महिला, पत्रकार आणि लहान मुलांचा समावेश आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जबलपूर येथे रोड शो केला. या कार्यक्रमासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. गर्दीमध्ये रस्त्यावरील एक स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये कुणालाही गंभीर इजा झालेली नाही. पंतप्रधानांची एक झलक पाहण्यासाठी गरजेपेक्षा जास्त लोक स्टेजवर चढले होते. पोलिसांनी सांगूनही लोकांनी ऐकलं नाही. त्यामळे स्टेज कोसळलं आणि लोक जखमी झाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबलपूरमध्ये झालेल्या रोड शोचे फोटो आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केले आहेत. ते म्हणतात, आज जबलपूरमध्ये रोड शो संपन्न झाला. येथील माझ्या कुटुंबियांचा उत्साह आणि जल्लोष पाहुन माझ्या तिसऱ्या टर्मला आशीर्वाद मिळतील, हे निश्चित आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि रस्त्यांसह येथे आम्ही काम उभं केलं आहे. त्यामुळे जबलपूरच्या विकासाला चालना मिळाली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.