Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

RSS चा काँग्रेसला पाठिंबा , RSS ची पोलीसात तक्रार :, काय प्रकार?

RSS चा काँग्रेसला पाठिंबा , RSS ची पोलीसात तक्रार :, काय प्रकार?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)ने माजी नगरसेवक जनार्दन मूद यांच्याविरोधात भारत सरकार आणि नागपूर पोलीस आय़ुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. जनार्दन मून यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ नावाची संघटना स्थापन केली आहे. त्यांच्या या संघटनेने लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पाठिंबा जाहिर केला होता. नामसाधर्म्यामुळे मूळ राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला याचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तक्रार दाखल करण्यात आलीय.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावानेच संघटना स्थापन केली. त्यानंतर काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. पण संघटनेचं नाव हे मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावासारखेच असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे याविरोधात संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी निवडणूक आयोग, भारत सरकार आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार केलीय 

जनार्दन मून यांनी युट्युब वरील व्हिडीओ तात्काळ काढून टाकावा आणि भविष्यात ते संघाचे नाव वापरणार नाहीत, याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, मागणीही RSSने केली आहे. संघविरोधी मानसिकता असलेले काही लोक समाजात संघाच्या नावाने संभ्रम पसरवतात असा आरोपही RSSने केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ मध्ये झाली होती. मात्र जनार्दन मून हे याच नावाने संघटना स्थापन करून मोठ्या प्रमाणावर लोकांची दिशाभूल करत आहेत. तसंच काँग्रेसला आरएसएस पाठिंबा देत असल्याचं खोटं सांगत आहेत. लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी लवकरात लवकर जनार्दन मूद यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह रविंद्र बोकरे यांनी केलीय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.