Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोठी बातमी, संशयित दहशतवाद्यांविरोधात NIA ची मोठी कारवाई

मोठी बातमी, संशयित दहशतवाद्यांविरोधात NIA ची मोठी कारवाई

पुणे : पुण्यामधून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी दोन संशयित दहशतवादांना कोथरूड परिसरातून अटक केली होती. चौकशीवेळी त्यांनी घरात बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतल्याचं समोर आलं होतं. अशातच NIA ने संशयित दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. संशयित असलेल्या आरोपींची मालमत्ता NIA कडून जप्त करण्यात आली आहे.

या सगळ्या प्रकरणाचा तपास NIA कडून सुरू आहे. आरोपींनी कोंढवा भागातील घरात राहू बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. ते महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचत होते. त्यांनी आयईडी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता. आरोपींनी ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचला होता त्या ठिकाणांचा शोध घेतला होता. महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध महानगरांमध्ये गुन्हे करण्याचा आरोपींचा कट होता, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली होती.


NIA कडून संशयित मोठी कारवाई

पुण्यातील कोंढवा परिसरातील एकूण 4 मालमत्ता NIA कडून जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित दहशतवादी राहत असलेला फ्लॅट देखील NIA कडून जप्त केला आहे. NIA कडून याप्रकरणी आणखी चार दहशतवाद्यांच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. यामुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

दरम्यान, सर्व आरोपी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून ते दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आलं आहे. मालमत्ता जप्त केली गेली म्हणजे एनआयएला आणखी काही मोठी माहिती मिळाली का हा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.