Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

EVM शिवाय भाजप 400 पार अशक्य ! 'या' बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ

EVM शिवाय भाजप 400 पार अशक्य ! 'या' बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ

भाजप ईव्हीएमशिवाय ४०० पार होणार नाही. म्हणून ईव्हीएम हॅकिंग थांबवण्याच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली.

व्हीव्हीपॅट पावती ही मतदारांच्या हातात आली पाहिजे आणि व्हेरीफाय झाली पाहिजे. मगच त्याने ती बॅलेट बॉक्समध्ये टाकावी. यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला भेटणार आहोत. ईव्हीएमची मोजणी झाल्यानंतर निकाल घोषित करणे अपेक्षित असते. 

या नंतर व्हीव्हीपॅटची पुन्हा मोजणी मागितली असेल, तर त्याचा निकाल हा अंतिम निकाल असेल. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी निवडणूक आयोगासमोर याचा आग्रह होत असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

आंबेडकर पुढे म्हणाले की, मला १९८५ च्या निवडणुकीचा अनुभव आहे. तेव्हाची निवडणूक ही बॅलेट पेपरवर होती. १९८९ ची निवडणूक सुद्धा बॅलेट पेपरवर झाली. बॅलेट पेपरवरील मतदान मोजायला १५ दिवस लागतील, असे नव्या पिढीला सांगितले जाते हा चुकीचा प्रचार आहे असे मी मानतो. त्यावेळेस मतदान संपले की, दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली तेव्हा रात्री १२ च्या आधी निकाल यायचा, असेही आंबेडकरांनी स्पष्ट केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.