Breaking News! काँग्रेसचा सांगली बाबत मोठा निर्णय : विशाल पाटीलच, नाना पटोले
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी अजून जाहीर झाली नाही. ही यादी येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर केली जाईल, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. पण त्या अगोदरच नाना पटोले यांनी सांगली मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचेही नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, येत्या दोन-तीन दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर होईल.
सांगली मतदारसंघातून विशाल पाटील यांना उमेदवारी
पुढे नाना पटोले म्हणाले, “काँग्रेस पक्षाने सांगली मतदारसंघातून विशाल पाटील यांना लोकसभा निवडणुकीत उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.” भाजपचे संजय काका पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. मविआमध्ये शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना ) काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारयांचा समावेश आहे.
कोण आहेत विशाल पाटील ?
दरम्यान, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे विशाल पाटील हे नातू आहेत. माजी खासदार प्रकाशबापू पाटील आणि महिला प्रदेश काँग्रेसच्या नेत्या शैलजा पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव, तर माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे लहान बंधू आहेत. विशाल पाटील यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांच्या पत्नीचे नाव पूजा असून त्यांना ईहिता व अरित्रा या दोन मुली आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणात विशाल पाटील यांचे दादा घराणे हे एकेकाळी महत्त्वाचे मानले जात होते. मधल्या काही काळात पाटील घराणे संघर्ष करत राहिले. तरीही माजी मुख्यमंत्री वसंतदादा यांचा राजकीय वारसा पुढे विशाल पाटील यांनी कायम ठेवला आहे. ते सध्या वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.