Breaking News! निवडणूक आयोगाचा नेत्यांना मोठा झटका, निवडणूक लढवण्यास केले आपत्र, यादीच वाचा....
निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. असे असताना लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या पूर्वसंध्येला निवडणूक आयोगाकडून देशभरातील अपात्र व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. यामध्ये राज्यातील 18 जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर निवडणुकीत खर्चाचे तपशील सादर न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत यादीच निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. त्यांना लोकसभा निवडणुक लढवता येणार नाही.
सध्या इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. अनेकांनी कित्येक वर्षांपासून यासाठी तयारी केली आहे. भाजपने सध्या जागा वाटपात आघाडी घेतली आहे. दरम्यान, ज्या 18 जणांना निवडणूक लढवता येणार नाही, यामध्ये मोहम्मद मेहमूद सय्यद शाह : मुंबई उत्तर- मध्य विधानसभा मतदारसंघ.
गायकवाड दिनकर धारोजी : जिंतूर विधानसभा, अमर शालिकराम पांढरे : आमगाव विधानसभा मतदारसंघ, उमेशकुमार मुलचंद सरोटे : आमगाव विधानसभा मतदारसंघ, दीपक चंद्रभान गाडे : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ ठाणे, नरेंद्र धर्मा पाटील (साळुंखे) : सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ धुळेतसेच मुदसरुद्दीन अलिमुद्दीन : नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ नांदेड, पांडुरंग टोलाबा वान्ने : लोहा विधानसभा मतदारसंघ नांदेड, गोविंदा अंबर बोराळे : नांदगाव विधानसभा मतदारसंघ नाशिक, आव्हाड महेश झुंजार : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ नाशिक.तसेच हबीबुर रहमान खान : भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ ठाणे, महेंद्र राजेंद्र बोराडे : बीड विधानसभा मतदारसंघ बीड, मोहम्मद सिराज मोहम्मद इक्बाल : मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघ मुंबई, विशाल दत्ता शिंदे : किनवट विधानसभा मतदारसंघ नांदेड, इम्रान बशर : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ नांदेड
सुमीत पांडुरंग बारस्कर : चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई, ब्रिजेश सुरेंद्रनाथ तिवारी : चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई, मोहम्मद इम्रान कुरेशी : चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई यांचा समावेश करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.