Breaking News! लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या 42 उमेदवारांची यादी जाहीर
लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. नुकतीच मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे. यामुळे कोणत्याही क्षणी भारतीय निवडणुका आयोगाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. अशा परिस्थितीत, सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सध्या दररोज काही ना काही नवीन राजकीय घडामोडी घडत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना सर्वाधिक वेग आला असल्याचे पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात लगेचच विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत.दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने देशभरातील उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 195 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.भाजपने जाहीर केलेल्या या यादीतून अनेक दिग्गज नेत्यांना वगळण्यात आले आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्व नेहमीच धक्कातंत्रांचा अवलंब करत असते. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करताना देखील भाजपाने असेच केले आहे. अनेक विद्यमान खासदारांची यादीतून नावे वगळली आहेत. दुसरीकडे भाजपा प्रमाणेच महाविकास आघाडी देखील लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.यासाठी सध्या महाविकास आघाडीमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. अशातच, एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टमध्ये महाराष्ट्रातील 42 लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार फायनल झाले आहेत. जागा वाटपावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे एकमत झाले असून या जागेवर कोणते उमेदवार उभे राहणार हे देखील आता समोर येऊ लागले आहे.
दुसरीकडे सहा जागांवर अजूनही रस्सीखेच सुरू आहे. पण लवकरच या जागांवरील तिढा देखील महाविकास आघाडी सोडवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 5 किंवा 6 मार्च 2024 रोजी महाविकास आघाडीची जागा वाटप संदर्भातील महत्त्वाची बैठक पार पडेल आणि याच बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. तत्पूर्वी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टने त्यांच्या सूत्राच्या हवाल्यानुसार महाविकास आघाडीकडून कोण-कोणते उमेदवार उभे राहू शकतात याची एक यादी पब्लिश केली आहे. दरम्यान आता आपण हीच यादी पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
उबाठा शिवसेनेची लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादीकल्याण - सुषमा अंधारे किंवा आदित्य ठाकरेठाणे - राजन विचारेमुंबई दक्षिण - अरविंद सावंतमुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाईमुंबई उत्तर पश्चिम - अमोल कीर्तीकरपालघर - भारती कामडीछ. संभाजीनगर - चंद्रकांत खैरेनाशिक - विजय करंजकररायगड - अनंत गीतेरत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊतमावळ - संजोग वाघेरेबुलढाणा - नरेंद्र खेडेकरवाशिम-यवतमाळ- संजय देशमुखपरभणी - संजय जाधवशिर्डी - भाऊसाहेब वाकचौरेधाराशिव - ओमराजे निंबाळकरजळगाव - हर्षल मानेहिंगोली - नागेश आष्टिकरराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटाचे संभाव्य उमेदवारबारामती - सुप्रिया सुळेशिरूर - अमोल कोल्हेसातारा - श्रीनिवास पाटील किंवा त्यांचा मुलगा सारंग पाटीलमाढा - लक्ष्मण हाके, हाके सध्या ठाकरे गटाचे प्रवक्ते, मात्र राष्ट्रवादीतून लढण्याची शक्यतारावेर - एकनाथ खडसेदिंडोरी - चिंतामण गावितबीड - नरेंद्र काळेअहमदनगर - निलेश लंकेभिवंडी - बाळ्या मामाकाँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादीगडचिरोली - डॉ. नामदेव उसेंडी , डॉ. नामदेव किरसान किंवा डॉ. नितीन कोडवते या तिघांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकतेनांदेड - आशा शिंदेलातूर - अजून नाव ठरलं नाहीधुळे - तुषार शेवाळे किंवा श्यामकांत सनेरनंदुरबार - के.सी.पाडवीवर्धा - हर्षवर्धन देशमुख किंवा समीर देशमुखनागपूर - अभिजित वंजारी,विशाल मुत्तेमवार किंवा प्रफुल गुडधेंपैकी एका उमेदवारी मिळण्याची शक्यता आहेजालना - उद्याप उमेदवार निश्चित नाही
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.