Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भूषण गगराणी BMC चे नवे आयुक्त

भूषण गगराणी BMC चे नवे आयुक्त 

मुंबई : महापालिकेच्या आयुक्तपदी IAS अधिकारी भूषण गगराणी यांची वर्णी लागली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर आयुक्त इकबाल सिंह चहल यांची बदली करण्यात आली होती. भूषण गगराणी यांच्याकडे सध्या मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून जबाबदारी होती.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुक्त इक्बालसिंह चहल यांना हटवल्यानंतर आयुक्तपदासाठी तीन सनदी अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली होती. यामध्ये भूषण गगराणी महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी व बेस्टचे अनिल डिग्गीकर यांच्या नावंचा समावेश होता.

निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र याबाबतचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मुंबई महापालिका आयुक्तपदी भूषण गगराणी, ठाणे महानगर पालिकेच्या आयुक्तपदी अभिजीत बांगर यांच्याजागी सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नवी मुंबईच्या आयुक्तपदी कैलास शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तयाशिवाय मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपदी अंभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भूषण गगराणी हे ११९० केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये २०२२ ला त्यांची अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांची निवड झाली होती. गगराणी यांनी महविकास आघाडीचा काळात नगर विकास खात्यात अतिरिक्त मुख्य सचिव पदी काम पाहिले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.