Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक कारण ! डॉक्टरने सर्जिकल ब्लेडने मुलीचा गळा चिरला, नंतर स्वतःलाही संपवलं

धक्कादायक कारण ! डॉक्टरने सर्जिकल ब्लेडने मुलीचा गळा चिरला, नंतर स्वतःलाही संपवलं

हरियाणा राज्यातल्या हिस्सार जिल्ह्यात एका डॉक्टरने आपल्या आठ वर्षांच्या मुलीची हत्या केली असून, त्यानंतर त्याने आत्महत्या केली. या अत्यंत भीषण घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. हे डॉक्टर पशुवैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हिस्सारमधल्या लाला लजपतराय पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान विद्यापीठाच्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये प्रोफेसर संदीप गोयल कार्यरत होते. एएसपी राजेश मोहन यांनी सांगितलं, की त्यांच्या नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीत असं कळलं आहे, की ते मानसिकदृष्ट्या आजारी होते. त्यांना डिप्रेशनचा त्रास होता आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते उपचार योग्य होत नसल्यामुळे त्यांनी अनेक डॉक्टर्स बदलले होते. आता या प्रकरणी अधिक माहिती गोळा केली जात आहे.

प्रोफेसर संदीप यांनी रविवारी (10 मार्च) सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्याच ऑफिसमध्ये सर्जिकल ब्लेड आणि चाकूच्या साह्याने आपल्या मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या पोटावर आणि हातांवर चाकूने वार करून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच. एसपी मोहित हांडा, एएसपी डॉ. राजेश मोहन, डीएसपी विजयपाल आणि फॉरेन्सिक लॅबच्या टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी, तपासणी केली. दोघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले.

जिंदमधलं नरवाना हे डॉ. संदीप गोयल यांचं मूळ गाव. ते आपली पत्नी नीतू गोयल आणि एकुलती एक आठ वर्षीय मुलगी सायना हिच्यासह संस्थेच्या ओल्ड कॅम्पसमध्ये असलेल्या सरकारी क्वार्टर्समध्ये राहत होते. रविवारी चार वाजण्याच्या सुमारास ते दुकानात जायच्या बहाण्याने मुलीला घेऊन घराबाहेर पडले. तासभर झाला तरी ते परतले नाहीत. त्यामुळे त्यांची पत्नी आणि आई दोघींनी त्यांना फोन केला. तो उचलला न गेल्याने त्या दोघी या दोघांना शोधत त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्या.

ऑफिसचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने तो दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा त्यांना बाप-लेक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं आढळलं. मुलीचा गळा कापलेला होता आणि पोटातून आतडी बाहेर पडलेली होती. डॉ. संदीप यांच्या पोटाच्या आणि हाताच्या शिरा कापल्या गेल्या होत्या. दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.