Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शाळा सोडल्यानंतर आडनावात बदल अशक्य; हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

शाळा सोडल्यानंतर आडनावात बदल अशक्य; हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

विद्यार्थिनीच्या आडनावात बदल करण्या सशिक्षण विभागाने नकार दिला आहे. शालेय कागदपत्रांवर याविद्यार्थिनीचे आडनावहुसेन आहे. त्याऐवजी सौदागरनमूद करावे, असे तिचे म्हणणेआहे. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असा बदल करता येत नाही , असे प्रतिज्ञापत्र शिक्षण विभागाने उच्च न्यायालयात सादर केले आहे .

गुणपत्रिकेतचुकीची नोंद

आयेशा व तिच्या वडिलांनी ही याचिका केली आहे. आयेशाने आडनाव लिहिताना चुकून हुसेन लिहिले. परिणामी तिच्या दहावी व बारावीच्या गुणपत्रिकेवर तसेच शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हुसेन नमूद आहे. तिचे मूळ आडनाव सौदागर आहे. हा बदल करण्यासाठी तिने शाळा व महाविद्यालयाकडे अर्ज केला. त्यास नकार देण्यात आला.


न्या. अतुल चांदुरकर व न्या. फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठासमोर सरकारी वकील अभय पत्की यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले. या विद्यार्थिनीने दहावीची परीक्षा 2016 मध्ये दिली. 2018 मध्ये बारावी उत्तीर्ण झाली. आता ही विद्यार्थिनी कर्नाटक येथे अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. तिला आडनावात बदल करायचा आहे. एवढय़ा उशिरा आडनावातील बदल करण्याची प्रक्रिया करता येणार नाही. तसा अधिकार शिक्षण विभागाला नाही, असे अॅड. पत्की यांनी न्यायालयात स्पष्ट केले.

काही स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर नावात बदल करणे शक्य आहे. ही चूक मूळ नोंदी करताना झाली असेल तरच त्यात बदल करता येतो, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालात नेमके काय आदेश देण्यात आले आहेत हे एकदा तपासून घ्या, असे आदेश न्या. चांदुरकर यांनी अॅड. पत्की यांना दिले व ही सुनावणी तहकूब केली.

लोकायुक्ताकडेतक्रार

आडनावात बदल करण्यासाठी लोकायुक्ताकडे तक्रार करण्यात आली. शाळा शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या आडनावात, जन्मतारखेत बदल करण्याचा विचार केला जाऊ शकतो. शाळा सोडलेल्या विद्यार्थ्याच्या आडनावात बदल करता येत नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे आयशा व तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आडनावात बदल करण्याचे आदेश न्यायालयाने शिक्षण विभागाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.