लोकसभेचं बिगुल वाजलं. अखेर निवडणुकांच्या तारखा जाहीर
आगामी लोकसभा निवडणुकीची आज शनिवार घोषणा झाली असून पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 एप्रिलला होणार असून 4 जूनला मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग 543 लोकसभा मतदारसंघांसाठीचा कार्यक्रम आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला. आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होत.
लोकसभा निवडणूकीच्या काळात सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर केल्या आहेत. यंदा भाजपकडून 400 पार चा नारा दिला आहे.भाजपने देखील तिसऱ्यांदा आम्हीच सत्तेत येऊ असा दावा केला आहे. दुसरीकडे, भाजपला पराभूत करु असा विश्वास विरोधकांनी व्यक्त केला आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे 97 कोटी लोक मतदान करणार आहेत.
त्यामध्ये 1.82 कोटी प्रथम मतदार असणार असून, 18 ते 21 वयोगटातील 21.50 कोटी मतदार आहेत, तर 48 हजार तृतीयपंथी मतदार आहेत. तसेच, पुरुषांपेक्षा महिला मतदारांचे प्रमाण अधिक असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.
7 टप्प्यात लोकसभा निवडणूक होती. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 एप्रिलला होणार असून 4 जूनला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. तसेच 4 जूनला सर्व देशात मतमोजणी होईल.
कोणत्या टप्यात कधी निवडणुका होणार :
पहिला टप्पा -19 एप्रिलदुसऱ्या टप्प्यात – 26 एप्रिलतिसरा टप्पा – 7 मेचौथा टप्पा – 13 मेपाचवा टप्पा – 20 मेसहावा टप्पा – 7 मेसातवा टप्पा – 1 जून
महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान होणार :
19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे
देशात 97 कोटी मतदार :
आपल्या देशात 97.8 कोटीहून अधिक मतदार आहेत. त्यात 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. यंदा 82 लाख प्रौढ मतदार मतदान करणार आहेत. 48 हजार तृतीयपंथीयही मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?
पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूरदुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीतिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगलेचौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.