साबरमती एक्स्प्रेस-मालगाडीत जोरदार टक्कर
राजस्थानच्या अजमेरमध्ये एक प्रवासी ट्रेन आणि मालगाडीमध्ये समोरासमोर धडक बसली आहे. यामुळे गेल्यावर्षीच्या कोरोमंडल एक्स्प्रेस अपघाताची अनेकांना आठवण झाली. साबरमती एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये अजमेरच्या मदार रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला.
हा अपघात रात्री १ वाजून १० मिनिटांनी झाला. यामुळे साबरमती एक्स्प्रेसचे इंजिन आणि चार कोच घसरले. एकाच ट्रॅकवर आल्याने हा अपघात झाला. दोन्ही ट्रेन एकाच ट्रॅकवर आल्याचे समजताच दोन्ही गाड्यांच्या लोकोपायलटनी इमर्जन्सी ब्रेक दाबले. परंतु साबरमती एक्स्प्रेस वेगात असल्याने ती थांबू शकली नाही व मालगाडीवर आदळली.
यामुळे ट्रेनचे चारही डबे रेल्वे लाईनपासून दूर घसरले गेले. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तिकडे धाव घेतली व बचावकार्य सुरु केले. या अपघातात कोणतीही जिवीतहाणी झालेली नाही. अधिकारी खूप विलंबाने अपघातस्थळी पोहचल्याचे प्रवाशांनी सांगितले.
धक्का बसल्याने झोपेत असलेले प्रवासी सीटवरून खाली कोसळले. यामुळे अनेकांना किरकोळ दुखापत झालेली आहे. अपघातानंतर अनेक प्रवासी पायीच शहराकडे चालत गेले. तर जे प्रवासी तिथेच थांबले त्यांना सुस्थितीत असलेले कोच जोडून पुढे पाठविण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.