Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधी मंडळात राडा! दादा भुसे अन् शिंदे गटाच्या आमदाराची विधीमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की?

विधी मंडळात राडा! दादा भुसे अन् शिंदे गटाच्या आमदाराची विधीमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की?

विधीमंडळाचा आज शेवटचा दिवस असतनाच आज शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच पक्षातील हे आमदार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे आपापसांत भिडले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार यावेळी भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केली. 

विधीमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे आमदार दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांनी एकमेंकांना धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. विधीमंडळाच्या लॉबीमध्येच हा राडा झाला आहे. यानंतर शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांना यामध्ये मध्यस्थी केल्याची माहिती समोर आली. यासंबधीचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. हा वाद कशावरून झाला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या प्रकरणावरून विरोधकांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली जात आहे. दरम्यान शिंदे गटातून या प्रकरणावर सारवासारव केली जात असल्याची चर्चा आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माध्यमांनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

कोणत्या कारणावरून हा वाद झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र ज्या पद्धतीचा वाद या एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये झाल्याचं समोर आलेलं आहे, यावरुन राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत वादाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भरत गोगावले आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी मध्यस्थी करत महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना थांबण्याचा प्रयत्न केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.