पुणे! मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार
विवाहित महिला घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन एका तरुणाने तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार डिसेंबर 2023 ते 3 मार्च 2024 या कालावधीत पीडित महिलेच्या घरात घडला आहे.
याबाबत 25 वर्षीय विवाहित महिलेने सोमवारी (दि11) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुरज अधिक हुलवान (वय-22 रा. लोणी काळभोर, ता. हवेली) याच्यावर आयपीसी 376, 376 (2) (एन), 452, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित महिलेच्या पतीचा ओळखीचा आहे. महिलेचे पती कामानिमित्त गुजारात येथे गेले होते. त्यावेळी महिला घरात एकटी होती. तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन आरोपीने फिर्य़ादी यांच्या घरी येऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्तापित केले. महिलेने त्याला विरोध केला असता मुलांना जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली.आरोपीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून महिलेने सोमवारी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका चौगुले करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.