लोकसभेसाठी मनोज जरागे यांची अंतरवालीमधून सर्वात मोठी घोषणा
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला. त्यांनी आज अंतरवली सराटी येथे मराठा बांधवांसाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यभरातून मराठा बांधव एकत्रित झाले आहे. या बैठकीत मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मराठा समाजातील बांधवाना महत्वाचे आवाहन केले असून ते म्हणाले आपला विषय लोकसभेचा नसून राज्यातील आहे.
आपल्याला आरक्षण देण्याचं काम राज्याचं आहे. कमीत कमी आठरा मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व आहे. आपला विषय केंद्राचं नसून राज्यच आहे.
लोकसभेला एकाचवेळी फॉर्म भरल्यावर समाज अडचणीत येऊ शकतो. मतदानाचं विभाजन होईल त्यासाठी एक पर्याय म्हणून अपक्ष म्हणून एकानेच एकाच जिल्ह्यातून फॉर्मभरा हा निर्णय आपला असेल. लोकसभेत आरक्षणाचा मुद्दा घेण्यात काहीच उपयोग नाही. अपक्ष उमेदवार उभा करायचा.प्रत्येक जिल्ह्यातून एक अपक्ष उमेदवार उभा करायचा पूर्ण शक्तीलावून लढायचं असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.