Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्याला अटक पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, मिरजेत एलसीबीची कारवाई

विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्याला अटक पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, मिरजेत एलसीबीची कारवाई

सांगली :  रिक्षातून विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. मिरजेतील वांडरे कॉर्नर येथे ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून विदेशी दारूच्या बाटल्या आणि रिक्षा असा पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.  

कुमार महादेव कांबळे (वय ४३, रा. भारतनगर, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैधरित्या दारू, शस्त्रे वाहतूकीवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले आहे. पथक मिरज शहरात गस्त घालत असताना एका रिक्षातून विदेशी दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.  

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने मिरज-म्हैसाळ रस्त्यावरील वांडरे कॉर्नर परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी पथकाला संशय आल्याने एक रिक्षा (एमएच १० एडब्लू ०५६३) अडवली. रिक्षाची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये विविध विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. याबाबत कांबळे याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. 

त्याला अटक करून रिक्षासह विदेशी दारूच्या बाटल्या असा पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, संजय कांबळे, आमसिद्ध खोत, अमर नरळे, सोमनाथ पतंगे, सोमनाथ गुंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.