Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'भाजपच्या उमेदवारीमुळे .' शिवसेना शिंदे गटाच्या 'या 'बड्या नेत्याने आरोप करत दिला राजीनामा

'भाजपच्या उमेदवारीमुळे .' शिवसेना शिंदे गटाच्या 'या 'बड्या नेत्याने आरोप करत दिला राजीनामा

भाजपने नुकतीच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जारी केली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. या यादीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचाही समावेश आहे.

माढा लोकसभा मतदार संघ पुन्हा एकदा भाजपकडे गेल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी उफाळून आली आहे. येथून शिंदे गटाच्या नेत्यांनी देखील लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं दर्शवल होत. शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजीनामा दिला आहे. संजय कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे आता शिंदे गटाला धक्का बसला आहे.

संजय कोकाटे राजीनामा देतांना नेमकं काय म्हणाले ?

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिंदे गटाला कुठलीही मदत केली नाही. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना जे कोणी सहकार्य करेल त्या कोणत्याही व्यक्ती आणि पक्षाला पाठिंबा देणार नाही. असं स्पष्ट केल्याचं संजय कोकाटे म्हणाले. ‘भाजप मराठा आणि धनगर आरक्षणसंदर्भात समाजमध्ये भांडण लावत आहे.’  आसा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. दरम्यान, माढा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा दिलाय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.