Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ओपिनियन पोल'बाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

ओपिनियन पोल'बाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय


नवी दिल्ली:  लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता ऐन उन्हाळ्यातच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून अनेक जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे काही जागांवरून महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षात रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान याच काळात वेगवेगळ्या माध्यम संस्थांकडून निवडणुकांच्या एक्झिट पोल आणि ओपिनिअन पोलबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.




आगामी लोकसभा निवडणूक 2024 लक्षात घेता 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत एक्झिट पोलवर बंदी असेल. आपल्या आदेशानुसार, भारत निवडणूक आयोगानें 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 1 जून रोजी संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. या कालावधीत सर्व लोकसभा मतदारसंघात एक्झिट पोलच्या निकालांचे प्रकाशन आणि प्रसारण करण्यास मनाई असेल.

राजस्थानचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता यांनी सांगितले की, अधिसूचनेनुसार, एक्झिट पोल घेण्यावर आणि एक्झिट पोलचे निकाल वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित करण्यास किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे प्रसारित करण्यावर पूर्ण बंदी असेल.

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, '19 एप्रिल ते 1 जून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत देशात एक्झिट पोलचं (POII) प्रसारण आणि प्रकाशन करण्यास बंदी असणार आहे. मतदान संपेपर्यंत 48 तासांच्या कालावधीत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कोणत्याही ओपिनियन पोलचे अंदाज किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मतदान सर्वेक्षणाच्या निकालांसह कोणतीही मतदानासंदर्भातील माहिती प्रदर्शित करण्यावर स्थगिती असेल."

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.