दीड तासानंतर अखेर फेसबुक-इन्स्टाग्राम सुरू झालं, नेमकं काय झालं होतं?
मुंबई : तब्बल दीड तासानंतर फेसबुक-इन्स्टाग्राम या दोन्ही सोशल नेटवर्किंग साईट्स सुरू झाल्या आहेत. मंगळवार 5 मार्चला भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजण्याच्या सुमारास फेसबुक-इन्स्टाग्राम या दोन्ही साईट्स आणि त्यांचे ऍप्स बंद पडले.
यूजर्सना त्यांच्या फेसबुक-इन्स्टाग्राम अकाऊंटवर लॉग इन करता येत नव्हतं, तसंच ज्यांचं आधीपासून लॉग इन आहे त्यांचं आपोआप लॉग आऊट झालं होतं. असं अचानक अकाउंट लॉग आऊट झाल्याने आपलं अकाउंट हॅक झालं नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला, पण मेटाच्या सर्व साईट्स आणि ऍप डाऊन झाली.
फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या यूजर्सना याचा फटका बसला. अखेर मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी लवकरच यावर तोडगा काढू, काळजी करू नका अशी पोस्ट एक्सवर लिहिली होती. फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा नेमका काय प्रॉब्लेम झाला होता, याबाबत मेटाकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.