Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब : या चिन्हावर लढणार

उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब : या चिन्हावर लढणार 

सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत भाजप मुख्यालयात जवळपास ३० मिनिटं तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या बैठकीत उदयनराजेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमळ चिन्हावर ते निवडणूक लढवणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून अजूनही खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. उदयनराजे हे सध्या दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. ''आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या 20 मतदार संघाची यादी जाहीर झालेली आहे. अजून 28 ठिकाणची मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर करणे बाकी आहे. त्यामुळे उरलेल्या 28 जागा या पुढील एक-दोन दिवसांमध्ये जाहीर होतील. त्यामुळे याविषयी थोडं थांबणं उचित होईल, असं सातारा लोकसभेचे संयोजक सुनील काटकर यांनी म्हटलं होतं.

उमेदवारी जाहीर होईपर्यंत वेगवगेळ्या गोष्टी घडणार आहेत. अजून वेगवेगळ्या पद्धतीचे अंदाज बांधले जाणार आहेत. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार असताना अवघ्या सहा महिन्यात राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे हजार उदयनराजे हे कमळाच्या चिन्हावरच लढतील. याआधी सुद्धा भाजपचा जिल्हा कार्यकारिणीने उदयनराजे यांना छुपा विरोध केला होता. अशा प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात होत्या. मात्र अशा कोणत्याही गोष्टी झालेल्या नाही. उलट उदयनराजेंची एकमताने सगळ्यांनी शिफारस केली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

आमदार असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील अन्य पदाधिकारी असतील या सर्वांच्या विचाराने भारतीय जनता पक्षाला सातारा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली पाहिजे, अशीच इच्छा व्यक्त केली होती. दोन दिवसात ती जाहीर होईल. उदयनराजे यांना अमित शाह यांची भेट मिळत नाही, या सर्व अफवा आहेत. आता आम्हाला मुंबईत ज्यांना भेटायचं होतं त्यांना आम्ही भेटलेलो आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.