कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी :उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषित
महाविकास आघाडीकडून कोल्हापुरातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज गुरुवारी कोल्हापूर येथे शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. शाहू महाराजांशी ऋणानुबंध हे माझ्या आजोबांपासून आहेत. याही पिढीत आणि पुढच्या पिढींमध्येही हे ऋणानुबंध असेच राहतील, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
ठाकरे म्हणाले, आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही. कारण, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. शाहू महाराजांना १०० टक्के विजयी करू. विजयाच्या सभेलाही नक्कीच येणार आहे. १९९७-९८ नंतर मी कोल्हापुरात शाहू महाजारांच्या भेटीला आलो. महाराजांकडून पुढील संघर्षात आशीर्वाद मिळावेत. यापुढेही कोल्हापुरात येत राहीन. शाहू महाराजांना पूर्ण ताकदीने निवडून आणू, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला.
ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. महाराजांच्या भेटीनंतर ठाकरे मिरजेतील सभेसाठी जाणार आहेत. सांगलीतील जागा शिवसेनेला देण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी मिरजेत जाहीर सभा होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.