Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

असा असेल 'काँग्रेसचा जाहीरनामा'

असा असेल 'काँग्रेसचा जाहीरनामा' 


लोकसभा निवडणुकीचे काउंटडाउन सुरु झाले आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच तारखेची घोषणा केली जाऊ शकते. अशात राजकीय पक्षांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार आणि रणनीती आखायला सुरुवात केली आहे. सत्तेत येण्यासाठी सर्व पक्षांच्या फोकस मतदारांकडे दिसून येतोय.

यादरम्यान निवडणुकीत सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे ‘घोषणापत्र’… मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाने तरुण, महिला , शेतकरी, मागास आणि गरीबांवर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच येत्या निवडणुकीत काँग्रेस AI च्या माध्यमांतून सर्वात जास्त प्रचार प्रसार करणार आहे. तर जाणून घेऊया काँग्रेसच्या ‘घोषणापत्रात’ नेमक्या कुठल्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

१ ) तरुणांना रोजगार

* या घोषणापत्रात तरुणांना पक्ष मोठ्या प्रमाणात नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊ शकतो.

* अग्नीवर योजना बंद करून जुन्या भर्ती प्रमाणे स्कीम लागू केली जाऊ शकते.

* पेपर लीक पूर्ण बंद करण्यासाठी सक्त कायदा आणणार आहे.

२) महिला सक्षमीकरण

* महिला सक्षमीकरनासोबतच त्यांच्या रोजगाबाबतच्या मुद्यावर काँग्रेस लक्ष केंद्रित करणार आहे.

* महिलांसाठी गृह लक्ष्मी योजना आणली जाणार आहे.या योजनेत महिलानांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे सरकारकडून जमा होतात.

* ही योजना काँग्रेसने हिमाचल मध्ये राबवली आहे.


३) ४५० रुपयांना सिलेंडर

* गॅस सिलेंडर ४५० मिळणार आहे. त्याबरोबर बस सेवेतील तिकिटांचे पैसे कमी होणार आहे.

४) शेतकऱ्यांना मोठी गारंटी देणार

शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी देण्याऐवजी एमएसपीची हमी देण्याचे आश्वासन म्हणजे शेतकऱ्यांच्या उपकरणावरील जीएसटी काढून टाकण्याचे किंवा कमी करण्याचे आश्वासन असू शकते.


५) रेल्वे तिकिटांचे दर होणार कमी

* मनरेगाला पर्याय बजेट देऊन योग्य प्रकारे लागू करण्यात येणार आहे. त्यासोबतच रेल्वे तिकिटांच्या दरात घट होणार…

६) क्रॉनी कैपिटलिज़्म पूर्णपणे संपवणार आहे.

* काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात क्रॉनी कैपिटलिज़्म (क्रोनी भांडवलशाही )संपवण्याचे आश्वासन देऊ शकते. याशिवाय लघुउद्योगांना चालना देण्यासाठी त्यांचे कर्ज काही प्रमाणात माफ करून त्यांना स्वस्त दरात कर्ज देण्याचे आश्वासन दिले जाऊ शकते.क्रॉनी कैपिटलिज़्म म्हणजे एक-दोन उद्योगपतींना मदत करण्याऐवजी नियमानुसार सर्वांना समान संधी मिळते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.