बुलेट न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक
सरकारने कठोर कायदे करूनही ट्रिपल तलाकची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील बांदा येथून समोर आला आहे. हुंडा म्हणून बुलेट न मिळाल्याने पतीने आधी मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर त्याने ट्रिपल तलाक दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या तक्रारीवरून या प्रकरणी 9 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण बिसंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे राहणाऱ्या पीडितेने पोलिसांना सांगितलं की, तिचे लग्न नोव्हेंबर 2018 मध्ये फतेहपूर येथे झालं होतं. वडिलांनी क्षमतेपेक्षा जास्त हुंडा देऊन लग्न करून दिलं होतं. पण हुंड्यावर सासरचे लोक समाधानी नव्हते. पाठवणीच्या वेळी हुंड्याव्यतिरिक्त बुलेट दोन लाख रुपयांची मागणी करत होते. बुलेट व पैसे न मिळाल्याने छळ सुरू झाला.
पीडितेने असंही सांगितलं की, तिला दोन मुले आहेत. तिने आपल्या मुलांसाठी हे सर्व काही सहन केले. दरम्यान, पतीने मुलाला हिसकावून घेऊन, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून तिला घराबाहेर हाकलून दिलं. यानंतर तो हुंडा मागत होता. मात्र वडिलांकडे हुंडा देण्यासाठी पैसे नव्हते. पतीने सर्वांसमोर तलाक दिला.
पोलीस स्टेशन प्रभारी मोनी निषाद यांनी सांगितलं की, एका महिलेने तिच्या सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. तिच्या तक्रारीच्या आधारे नऊ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.