शेकापाच्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन
शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे आज (दि.२९) निधन झाले. त्या दीर्घकाळ आजारी होत्या. त्यांच्यावर आज पेझारी येथे दुपारी २ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
शेतकरी कामगार पक्षाच्या झुंजार नेत्या अशी त्यांची ओळख होती. मीनाक्षीपाटील : कामगार पक्षाच्या झुंजार नेत्या
माहितीनुसार, शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे आज निधन झाले. त्यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या १९९५, १९९९ आणि २००९ अशा 3 वेळा त्या आमदार होत्या. १९९९ मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या काही काळ विकास राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. रायगड जिल्ह्यात प्रकल्प विरोधी अनेक लढ्यात त्यांचा सहभाग होता. शेकापचे आ. जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी होत. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत. मीनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून शोक प्रकट केला जात आहे. एक अभ्यासू नेत्या अशी त्यांची ख्याती होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.