Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तीन लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या दोघांना अटकगुन्ह्यातील कार जप्त, सांगली शहर पोलिसांची कारवाई

तीन लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या दोघांना अटकगुन्ह्यातील कार जप्त, सांगली शहर पोलिसांची कारवाई


सांगली :  तीन लाख रूपयांच्या खंडणीसाठी शहरातील हरिपूर रस्ता परिसरातील एकाचे कारमधून अपहरण करून मारहाण करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.  


निलेश बाळासाहेब गालींदे (वय ३०, रा. आनंद थिएटरसमोर, सांगली), मनोज मोहनसिंग दुबे (वय ३२, रा. वारणाली, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हरिपूर रस्ता परिसरात राहणाऱ्या सूरज पाटील (वय ३०) याला दोघांनी जबरदस्तीने कारमध्ये बसवून (एमएच ०९ एजे ९९७०) भोसे (ता. मिरज) येथील तलाव परिसरात नेले होते. तेथे नेल्यानंतर त्याच्या अंगावरील कपडे काढून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्याचे तुकडे तुकडे करून मारण्याची धमकीही दिली. नंतर दुबे याने सूरजचा मित्र विनायक आंबी याला व्हिडिओ कॉल करून त्याच्याकडे तीन लाख रूपयांची खंडणी मागितली. 


याची माहिती आंबी याने शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. संशयितांच्या मोबाईलचे लोकेशन काढले. ते सतत बदलत होते. त्यावेळी संशयित मिरजेहून सांगलीकडे येत असल्याची माहिती निरीक्षक मोरे यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. मध्यरात्री अडीचच्या सुमारास वालचंद महाविद्यालयासमोर संशयितांच्या कारचा थरारक पाठलाग करून पथकाने अपहृत तरूणाची सुटका करून दोघांना अटक केली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. 

सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहरचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, सचिन शिंदे, संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, विनायक शिंदे, गणेश कांबळे, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.