Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोठी बातमी: भाजपकडून लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर

मोठी बातमी: भाजपकडून लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीमुळे सध्या संपूर्ण देशात राजकीय घडामोडींना वेग आलाय. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जातोय. एखाद्या नेत्याची जिंकण्याची क्षमता लक्षात घेऊनच भाजपकडून संबंधित नेत्याला तिकीट दिल जात आहे. भाजपने याआधी आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. असे असतानाच आता भाजपने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे. 

पहिली यादी 2 मार्च रोजी

भाजपने याआधी 2 मार्च रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. ही यादी महाराष्ट्राती भाजपचे नेते विनोद तावडे यांनी जाहीर केली होती. या यादीत देशभारीतल वेगवेगळ्या 195 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले होते. यात सध्या मोदी यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या 34 मंत्र्यांचा समावेश होता. भाजपने आपल्या पहिल्या यादीत एकूण 28 महिला नेत्यांनाही तिकीट दिलेले आहे. विशेष म्हणजे या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता.


गडकरींचे नाव नसल्यामुळे भाजपवर टीका

भाजपच्या पहिल्या यादीत भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नव्हता. यामुळे महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपावर सडकून टीका केली होती. गडकरी यांना अपमानित करण्यासाठीच त्यांच्या नावाचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना खुली ऑफर दिली होती. या टीकेनंतर भाजपने महाराष्ट्रातील २० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले होते. यात गडकरी यांच्या नावाचा समावेश होता.


दुसऱ्या यादीत दिग्गज नेत्यांचं नाव

भाजपाच्या दुसऱ्या यादीत एकूण 72 उमेदवारांची नावे होते. यामध्ये नितीन गडकरी यांच्यासह, पीयुष गोयल, अनुगार ठाकूर, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल ठक्कर, रविंद्रसिंह रावत, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा समावेश होता.

तिसऱ्या यादीत कोणाचा समावेश?

भाजपच्या या तिसऱ्या यादीत एकूण 9 जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत. उमेदवारी घोषित करण्यात आलेल्या सर्व जागा या तमिळनाडू राज्यातील आहेत.  यामध्ये तमिळनाडूचे भाजपचे नेते तथा माजी आयएएस अधिकारी के. अण्णामलाई यांच्या नावाचा समावेश आहे. ते कोईंबतूर येथून निवडणूक लढवणार आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.