Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सभासदांच्या विश्वासाचा ठेवा आमच्याकडे सुरक्षित : श्री. रावसाहेब पाटील संस्थेची ६२ वी व मिरज येथील ३ या शाखेचे उद्घाटन

सभासदांच्या विश्वासाचा ठेवा आमच्याकडे सुरक्षित : श्री. रावसाहेब पाटील संस्थेची ६२ वी व मिरज येथील ३ या शाखेचे उद्घाटन


मिरज : मिरज शहरामध्ये कर्मवीर पतसंस्थेच्या सध्या २ शाखा कार्यरत असून संस्थेची सेवा अत्यंत समाधानकारक असल्यामुळे शिवाजी पुतळा, मंगळवार पेठ, मिरज या 'भागातील सभासद ठेवीदारांसाठी नविन शाखा सुरु करावी अशी मागणी सभासदांनी केली होती. त्याला अनुसरुन संस्थेची ६२ वी व मिरज शहरातील ३ या शाखेचे उ‌द्घाटन नुकतेच संपन्न झाले. त्यामुळे मिरज शहरातील सभासदांना जलद सेवा देण्यास मदत होणार असल्याची भावना संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी व्यक्त केली

प्रारंभी दिपप्रज्वलन व कर्मवीर आण्णांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. संस्थेचे संचालक मंडळ, स्थानिक सल्लागार व शहरातील मान्यवरांच्या हस्ते नुतन अद्यावत शाखा आजपासूनच ग्राहक सेवेस समर्पित करण्यात आली. संस्था सभासदांच्या हिताला सर्वोत्तम प्राधान्य देत आली असून सभासदांच्या विश्वासाचा ठेवा आमच्याकडे अत्यंत सुरक्षित आहे असा विश्वास चेअरमन श्री. रावसाहेब पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक करताना दिला. संस्थेला मंजुर असलेल्या आणखी ५ शाखा देखील अल्पावधीतच सुरु करण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले. संस्थेच्या ६१ शाखामधुन सभासदांचा अतिशय चांगला प्रतिसाद लाभत असून येत्या मार्च २०२४ अखेर रु.११५१ कोटी ठेवीचे उद्दीष्ट संस्था संपादन करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मंगळवार पेठ मिरज शाखेचे नवनियुक्त सल्लागार श्री. रोहीत रमेश चिवटे, श्री. ओंकार कुमार यादवाडे, श्री. सुकुमार नेमगोंडा पाटील, श्री. सुनिल महावीर अथणे, श्री. अमर राजाराम भालकर यांचा श्री. रावसाहेब पाटील यांच्या हस्ते तर शाखा सुभाषनगर, मिरज येथील नवनियुक्त सल्लागार श्री. अशोक नाभगोंडा पाटील, श्री. अब्दुलकादर शमशोद्दीन मालगांवे श्री. कलगोंडा शामगोंडा कोले. श्री. अभिनंदन श्रीपाल भोकरे श्री. श्रीकांत महादेव खिलारे यांचा संचालकां च्या हस्ते सत्कार करणेत आला.

यावेळी माजी महापौर किशोर जामदार श्री. विनोद पाटोळे, श्री. सुरेश देशमुख. प्रा.एम.एस. रजपूत श्री. कलगोंडा शामगोंडा काळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास श्री. सतिश सारडा शितल पाटील, सागर वडगांवे डॉ. धनपाल माणकापुरे. गुंडूराव खोत, अविनाश पाटील, पत्रकार सुनिल पाटील दादासाहेब पाटील, अँड. एस. ए. जमादार, अॅड. दुधगांवे, डॉ. भालचंद्र शिरगांवे, प्रमोद शेटे हे मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमास संचालक अॅड. एस. पी. मगदूम डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. ए. के. चौगुले (नाना) डॉ. एस.बी. पाटील (मोटके) संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री. लालासाहेब भाऊसो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे यांनी मानले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.