एक मराठा लाख मराठा घोषणेचे जनक बाळासाहेब घाटगे यांचं निधन
मराठा आरक्षण चळवळीचे नेते प्रताप बाळासाहेब घाटगे यांचे आज (दि.२४) अल्पशा आजाराने निधन झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा आरक्षणात चळवळीचे पितामह म्हणून घाटगे यांची ओळख होती.
एक मराठा लाख मराठा घोषणेचे जनक या घोषणेचे ते जनक होते. कोल्हापुरातील शहीद भगतसिंग तरुण मंडळ, बुधवार पेठ येथील राहत्या घरी सांयकाळी पाच वाजता त्यांचे निधन झाले. बाळासाहेब घाटगे हे शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.