जालन्यातून मनोज जरांगे यांनीच निवडणूक लढवावी : मराठा समाजाच्या बैठकीत ठराव
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना प्रत्येक पक्ष उमेदवारांचे नाव जाहीर करत आहे. या दरम्यान जालना लोकसभेसाठी मनोज जरांगे पाटील यांनीच उमेदवारी दाखल करावी. अपक्ष उमेदवार नकॊच; असा ठराव मराठा समाजाच्या वतीने आयोजित बैठकीमध्ये एकमताने संमत करण्यात आला.
जालना लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा उमेदवार निवडावा किंवा अपक्ष उमेदवार उभा करावा; या बाबत आज जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद, जालना आणि बदनापूर तालुक्यातील मराठा समाजाच्या बैठका घेण्यात आल्या. या समाजाच्या बैठकीत मराठा समाजाने स्वातंत्र्य उमेदवार दिला, तर त्याचा परिणाम काय होईल.? यावर चर्चा करण्यात आली.
समाजाच्या अपक्ष उमेदवारामुळे आरक्षण आंदोलनाला विरोध करणाऱ्या पक्षाला याचा मोठा फायदा होईल, अशी शंका या बैठकीत उपस्तित करण्यात आली. यावरून जरांगे पाटील यांनीच उमेदवारी करावी असा बैठकीत एकमताने परित करण्यात आलेला ठराव तात्काळ जरांगे पाटील यांना पाठवण्यात आला. यावर मनोज जरांगे पाटील उद्या काय निर्णय घेतात हे पाहणं अत्ता महत्वाचं ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.