सांगली: लोकसभा निवडणूक तसेच आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील सराईत गुन्हेगाराला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. सांगली शहर पोलिसांच्या प्रस्तावावर मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांनी हा निर्णय दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
उमर हारूण पठाण (वय २५, रा. पाकिजा मस्जिदजवळ, १०० फुरी रोड, सांगली) असे हद्दपार करण्यात आलेल्याचे नाव आहे. लोकसभा निवडणूक आणि आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीच्या कारवाईचे प्रस्ताव सांगली शहर पोलिसांनी तयार केले आहेत. ते प्रस्ताव मंजुरीसाठी मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले होते.
उमर पठाण याच्याविरोधात गर्दी मारामारी, गांजाचे सेवन, गंभीर दुखापत, आस्तित्व लवपून फिरणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरू होत्या. त्यामुळे सांगली शहरचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी त्याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. तो मंजूर करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय मोरे, अभिजित देशमुख, सिद्धाप्पा रूपनर, दीपक गट्टे, आसमा शेख, अभिजित माळकर आदींनी या कारवाईत भाग घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.