खानापूर : होळी नेताना गाड्याच्या चकाखाली सापडून तरुण ठार
सर्वत्र होळीची धामधूम सुरू असताना भुरुणकी (ता. खानापूर) गावाजवळील जंगलात एक दुर्घटना घडली आहे. होळी नेताना गाड्याच्या चाकाखाली सापडून तरुण जागीच ठार झाला आहे.
बसवराज देवाप्पा शिगेहळ्ळी (वय २५, रा. देगाव ता. कित्तूर) असे त्याचे नाव आहे. कित्तूर तालुक्यातील देगाव व शिरगापूरचे ग्रामस्थ खानापूर तालुक्यातील मास्केनहट्टी व भुरुणकी जंगलातून होळी नेतात. अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे. यावर्षीही सोमवारी दुपारी देगावहून होळी नेण्यासाठी ग्रामस्थ आले होते. होळीचे झाड तोडून मोठ्या गाड्यात घालून ते नेत असताना मास्केनहट्टी जवळील एका ओढ्याजवळ उतरतीला गाड्याचा वेग अचानक वाढला. त्याखाली सापडून बसवराजचा जागीच मृत्यू झाला. नंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.