Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कवयित्री प्रणाली मंगेश म्हात्रे आणि दीपा वनकुद्रे यांना '"साहित्यप्रभा" पुरस्कार जाहीर.

कवयित्री प्रणाली मंगेश म्हात्रे आणि दीपा वनकुद्रे यांना '"साहित्यप्रभा" पुरस्कार जाहीर.

जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून समाजात विशेष योगदान देणाऱ्या स्त्रियांचा सन्मान "साहित्यसंपदा भूषण " पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे.सदर पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.यास महाराष्ट्रातून विविध भागातून आणि विविध स्तरांतुन उत्तम प्रतिसाद लाभला.आलेल्या प्रस्तावांचे परीक्षण करून निवडसमितीने महिलादिनाच्या पूर्व संध्येला पुरस्कारांची घोषणा केली.
   
माय माती फौंडेशन संस्थापिका आणि वृक्ष लागवड चळवळीत सक्रिय सहभाग असणाऱ्या ,आदिवासी मुलांसाठी विशेष उपक्रम राबविणाऱ्या  प्रभावती पाटील (धामणगाव -जळगाव ) ,सामाजिक  शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात  योगदान देणाऱ्या प्रीती दबडे (पुणे ),आकाशवाणीच्या माध्यमातून मराठी साहित्य प्रचारास हातभार लावणाऱ्या पूजा काळे (मुंबई ) ह्यांना "साहित्यसंपदा भूषण " पुरस्कार प्राप्त झाला आहे असे राहुल तवटे ,मनोमय मीडिया ह्यांनी जाहीर केले.

महाराष्ट्रातील अनेक गझलकारांना मार्गदर्शन करणाऱ्या .गझल प्रचार प्रसार करताना साहित्यक्षेत्रास आपले बहूमूल्य योगदान देणाऱ्या गझल गुरु उर्मिला बांदिवडेकर(नवीमुंबई) ह्यांना "साहित्य दीपस्तंभ" पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

तसेच साहित्यक्षेत्रात वैयक्तिक उत्तम कामगिरी पार पाडत आणि अनेक समूहांच्या माध्यमातून लिह्त्या हातांना बळ देणाऱ्या दीपा वणकुद्रे (मुंबई ),गीतांजली वाणी(मुंबई ) ,अश्विनी अतकरे(अमरावती ),मुग्धा कुंटे(मुंबई ) ,शीतल राऊत(अमरावती ),प्रणाली म्हात्रे (मुंबई ) ह्यांना "साहित्य प्रभा" पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्व पुरस्कार प्राप्त महिलांचे साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे ह्यांनी आभार मानताना त्यांना भावी  वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.