Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पैशाच्या पलंगावर झोपलेली ' ही ' व्यक्ती कोण आहे समजल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल

पैशाच्या पलंगावर झोपलेली ' ही ' व्यक्ती कोण आहे समजल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल 


सोशल मीडियावर एक व्यक्ती पैशांच्या ढिगाऱ्यावर झोपल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. या सर्व 500 रुपयांच्या नोटा असून, फोटो पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. यानंतर ही व्यक्ती कोण आहे याची चर्चा रंगली आहे हा फोटो आसामचा असून त्यात दिसणाऱ्या या व्यक्तीचं नाव बेंजामिन बासुमतारी आहे. तो उदलगिरी जिल्ह्यातील भैरागुरी येथील ग्राम परिषद विकास समितीचा अध्यक्ष आहे. फोटोत बेंजामिन बासुमतारी एका पलंगावर आहे ज्यावर 500 रुपयांच्या नोट पडल्या आहेत. याशिवाय काही नोटा त्याच्या शरिरावरही दिसत आहेत. 

भ्रष्टाचाराचा आरोपी

बोडोलँडच्या या नेत्यार भ्रष्टाचाराचा आरोप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान आवास योजना आणि ग्रामीण रोजगार योजनेत झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाशी त्याचा संबंध आहे. आरोपानुसार त्याने ओडलगुरी डेव्हलपमेंट झोनमध्ये ग्राम परिषद विकास समिती अंतर्गत पंतप्रधान आवास योजना आणि मनरेगा योजनांच्या गरीब लाभार्थ्यांकडून लाच घेतली.

हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावर प्रतिक्रिया उमटत असून लोक संताप व्यक्त करत आहेत. हा भ्रष्टाचारविरोधी भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बोडोलँड-आधारित युनायटेड पीपल्स पार्टी लिबरलचा  सदस्य आहे का? अशी विचारणा केली जात आहे. 

यूपीपीएलचे प्रमुख आणि बोडोलँड टेरिटोरियल काऊन्सिलचे (बीटीसी) मुख्य कार्यकारी सदस्य प्रमोद बोरो यांनी आज सकाळी स्पष्टीकरण जारी केल आहे. बेंजामिन बासुमातारी आता पक्षाशी संबंधित नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

"बेंजामिन बासुमतारी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आम्हाला स्पष्ट करायचं आहे की, बेंजामिन बासुमतारी आता युपीपीएलशी संबंधित नाहीत. 10 जानेवारी 2024 ला त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. तसंच 5 जानेवारी 2024 रोजी हरिसिंगा ब्लॉक कमिटी, UPPL कडून पत्र मिळाल्यानंतर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली," अशी माहिती प्रमोद बोरो यांनी दिली आहे. 

"याशिवाय, सरकारने 10 फेब्रुवारी 2024 रोजी त्याला ग्राम परिषद विकास समितीच्या अध्यक्षपदावरुन निलंबित केलं आणि काढून टाकलं. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी बेंजामिन बासुमतारी यांचा UPPL शी संबंध जोडू नये. त्याची कृती ही केवळ त्यांची स्वतःची जबाबदारी आहे आणि त्यांच्या कोणत्याही वैयक्तिक कृत्यासाठी पक्ष जबाबदार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.