नागपूर : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीकरीता कॉंग्रेसने आपल्या उमेवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. सुरूवातीला कॉंग्रेसने एकूण सात जणांची आणि आता चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
यामध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात कुणाला उमेदवारी दिली जाईल याची प्रतिक्षा लागून होती. त्यात आता कॉंग्रेसने नितीन गडकरी यांच्या विरोधात माजी आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.कॉंग्रेसने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातुन रामटेक मतदारसंघातून रश्मी बर्वे, गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातून नामदेव किरसान, नागपुरातून विकास ठाकरे, तर भंडारा गोंदिया मतदारसंघातून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्याठिकाणी आता प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत म्हणून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. याठिकाणी कॉंग्रेसकडून आमदार प्रतिभा धानोरकर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं आणि त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या नावाचीही चर्चा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.