पश्चिम बंगालमधील गरिबांकडून लुटलेला आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केलेला पैसा लोकांना परत मिळावा यासाठी आपण काम करीत आहोत," अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात पक्षाच्या उमेदवार आणि राजघराण्यातील माजी सदस्य अमृता रॉय यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात मोदींनी ही ग्वाही दिल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी राजमाता अमृता रॉय यांना सांगितले की, "भ्रष्टाचाऱ्यांनी सर्वसामान्यांचा पैसा लुटला आहे आणि ईडीने त्या भ्रष्ट लोकांकडून जी काही मालमत्ता आणि पैसा जप्त केला आहे, तो गरीब जनतेला परत केला पाहिजे. त्यासाठी ते कायदेशीर पर्याय शोधत आहेत," असे एका भाजप नेत्याने सांगितले. एकीकडे सध्याचे केंद्र सरकार देशातून भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि दुसरीकडे सर्व भ्रष्टाचारी एकमेकांना वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत, असेही ते म्हणाले.
पैसे कसे परत करणार?
पंतप्रधान व रॉय यांच्यातील संभाषणाचा तपशील देताना नेत्यांनी सांगितले की, नोकरीसाठी लाच म्हणून दिलेली रक्कम सुमारे ३ हजार कोटी रुपये असल्याचा पंतप्रधानांचा अंदाज आहे. मोदीनी रॉय यांना याबाबत लोकांना सांगण्यास सांगितले. सत्तेत आल्यानंतर जनतेचे पैसे परत देण्याचा मार्ग काढू, गरज पडल्यास कायदेशीर पर्यायही शोधले जातील, असे पंतप्रधान म्हणाले.
३५ जागा मिळविण्याचे कठीण उद्दिष्ट
पश्चिम बंगाल भाजपने अंतर्गत कलह, संघटनात्मक उणिवा आणि डाव्या-काँग्रेस आघाडीचे स्वतंत्र आव्हान या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या ३५ जागा मिळविण्याचे कठीण उद्दिष्ट ठेवले आहे. सीएए अंमलबजावणीचे लक्ष्य साध्य करणे ही त्याची गुरुकिल्ली आहे. भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या करिष्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
मागितली माफी
भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. टीएमसीने त्यांच्या टिप्पणींबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.